web-ads-yml-728x90

Breaking News

सलमान खानची सावली गुरमित सिंग उर्फ शेरा...( मुलाखतकार : कुणाल नामदेव शेलार,मुरबाड )


BY - युवा महाराष्ट्र लाइव,( मुलाखतकार : कुणाल नामदेव शेलार,मुरबाड )
सलमान खानचा जवळचा,अंत्यत विश्‍वासू तसेच  सलमान खानची सावली म्हणून गुरमित सिंग उर्फ शेरा यांची संपुर् देशात ओळख आहे.मागील गेल्या 23 वर्षापासून गुरमित सिंग उर्फ शेरा हा सलमान खानचा बॉडिगार्ड म्हणून काम करत आहे.जेथे सलमान खानला जायाचं झालं तेथे एक दिवसा अगोदर शेरा त्याठिकाणी पोहोचतो.गर्दी दुर करण्यासाठी शेरा कधी कधी 7-8 किलोमीटर पर्यंत स्वतः चालला आहे.सलमान खानने पहिलेच सगळया बॉडिगार्डना सांगितले आहे की,मला भेटण्यासाठी आतुरता  असलेल्या व भेटण्यास आलेल्या चाहत्यांना कोणत्याही प्रकारे इजा होता कामा नये कारण ते चाहते नसुन माझे कौटूंबिक सदस्य आहेत अशी माहिती गुरमित सिंग उर्फ शेरा यांनी आमच्या युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली आहे.
आत्ता कोरोना सध्या आपल्या भारतात थैमान घालत आहे अशा वेळी शासनानी आपल्या सर्वांना घरी थांबण्याचं आवाहन केले असून मी त्यांना  सहकार्य करत आहे  आपण सगळया देशबांधवांनी सहकार्य करावे असे आवाहनही या प्रसिध्द माध्यमातून केले आहे.
          सलमान खान हा हिरो देशभरात  प्रसिध्द कलाकार आहे हे तर सर्वांनाच  माहित आहे.सर्वांच्या सुखदुखःत सहभागी घेत असतो.गोरगरिबांना आणि महत्वपुर्ण सांगायचे झाले तर लहान मुलांच्या जीवनात कोणत्याही प्रकारे अडचण  नको म्हणून त्यांच्या मदतीसाठी बिईंग हृयुमन म्हणून मदत करण्यात सिंहाचा वाटा घेतला आहे त्याच्या या मदतीत जी  किक मिळते ती कशात नाही हे सलमान खाननी कित्येक वेळा सिध्द केले आहे.सर्वांना मदतीसाठी सलमान खानचा  मदतीचा हात हा नेहमी पुढे असतो.अशा व्यक्तीमत्वाची जाण असलेला कलाकार,त्याचं नाव सलमान खान.भारत देशाच्या कल्याणकारी कार्यात प्रत्येक वेळी सलमान खान व त्याचा बॉडीगार्ड गुरमित सिंग उर्फ शेरा यांचे मोलाची मदत मिळत आहे.अशा सलमानची सावली असलेल्या गुरमित सिंग उर्फ शेरा यांनी कधीही सलमान खानला सोडण्याचा विचार केला नाही.कित्येक क्षेत्रातून बॉडीगार्ड म्हणून त्यांना सन्मानाने काम करण्यासाठी प्रस्ताव आले परंतू पहिले ही मी सलमानच्या जोडीला होतो आणि शेवटच्या श्‍वासापर्यंत सलमान खानच्या सोबतच सावली सारखा राहणार अशा भावना त्यांनी आमच्याशी बोलतांना स्पष्ट केले आहे.पैशासाठी मी काम करत नाही आणि कधी केले नाही म्हणून माझी भुमिका सर्वांना भावुन जाते.   

     सलमान खानला शेरा भार्इ म्हणून बोलत असून सलमानला शेरा मालकही कधी कधी बोलतो.मालकासाठी मी काहीही करेल फक्त एक शब्द मालिक यांनी द्दयावा मी करेल तेच माझे सर्वस्व आहेत.भार्इसाठी माझे जीवन कोनत्याही झोक्यात टाकायला तयार आहे.त्यांच्याकडून मला मिळालेले प्रेम मी कधीही विसरू शकणारे नाही.त्यांनी मला त्यांच्या कुटूंबातील सदस्य म्हणून जो सन्मान दिला त्यातुन दिसले की भार्इच्या मनात शेरा ची किंमत काय आहे ते.माणसातला माणूस ज्यांनी शोधला तो जिंकला असाच माणूस मी सलमान भार्इत पाहिला म्हणून मी सर्वस्व जिंकला असे गुरमित सिंग उर्फ शेरा यांनी आमच्याशी संवाद साधतांना म्हंटले आहे.
प्रत्येक क्षणी सलमान खानच्या सोबत शेरा यांनी साथ देत सिध्द केलं आहे की,कर्तव्य काय असते आणि नातं कसे जपायचं.गुरमित सिंग उर्फ शेरा जेव्हा जेव्हा सलमान खान सोबत असतात तेव्हा सलमानचे रक्षण एक बॉडिगार्ड म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून करतात.      

     सलमान खानच्या सांगण्यावरून इवेंट कंपनी विजक्राफ्ट कंपनी खोलण्यात आली आहे.शेरा यांची स्वतःची टायगर सिक्युरिटी कंपनीही आहे या कंपनीच्या माध्यमातून सर्व चित्रपट सृष्टीतील कलाकारांना रक्षक म्हणून बॉडिगार्ड पुरविण्यात येते.अशा गुरमित सिंग उर्फ शेरा यांना बॉडिबिल्डरकीचा छंद असून 1987 साली ज्युनिअर मिस्टर मुंबर्इ व त्यानंतर पुढिल वर्षात ज्युनिअर मिस्टर महाराष्ट्र म्हणून निवड करण्यात आले.अशा सलमान खानची सावली म्हणून ठरलेला गुरमित सिंग उर्फ शेरा यांनी अलीकडे सामाजिक कार्याचा वारसा जोपासला असून त्यांच्या या कार्याला संपुर्ण महाराष्ट्र सलाम करत आहे.अनेकांना मदतीचा हात देणारा सलमान खान सारखा कलाकार नाही असा कलाकार भारताला लाभला तो हिरा आणि त्याच्यासमवेत सावली म्हणून सदैव राहणारा गुरमित सिंग उर्फ शेरा


No comments