0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
कोरोना विषाणु उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकरण  म्हणून घोषित केले आहे.ज्या अर्थी शेअर रिक्षा,शेअर ओला,शेअर उबर व ग्रामीण भागातील काळया पिवळया जीप मधून सर्व सामान्य प्रवासी शेअरींगद्वारे शहारतंर्गत व ग्रामीण भागात ये जा करत असतात त्या अनुषंगाने प्रवासा दरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिक्षा,शेअर,ओला,शेअर उबर  व ग्रामीण भागातील काळया पिवळया जीप ही प्रवासी वाहतूक करणारी व्यवसायिक वाहने बंद 31 मार्च 2020 पर्यंत करण्यात आले आहे पुढिल कोणतेही आदेश मिळेपर्यंत सदर बंद हा पाळण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने मुरबाड मध्ये जेथे गर्दी होऊ नये म्हणून बाजारपेठ,आठवडी बाजार व अत्यावश्यक वस्तु वगळून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.व्यापारी वर्गांनी मुरबाड बंद ला पुर्णतः सहकार्य केले असून मुरबाडच्या नागरिकांनी अतिदक्षता जोपासून घराबाहेर पडल्याचे टाळले आहे.काल मुरबाड शहरात आज पासून बंद ठेवण्यात येण्याच्या सुचना दिल्या होत्या त्या सुचनाचे व आदेशाचे पालन सर्व व्यवसायिक वर्गांनी पाळले, 
परंतू मुरबाड नगरपंचायत इमारतीमधील भारत वॉर्इन शॉपचा मालक गेटचे जाळया लावून दारूची विक्री करत गर्दी करून व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले त्यावेळी युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीने सदरील बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा तात्काळ भारत वॉर्इन शॉप बंद करण्याचे आदेश दिले.कारवार्इ जरी अधिकारी वर्गांनी केली गेली नसली तरी त्याची दखल मात्र युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीने घेतली त्याबद्दल युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीचे सर्व नागरिकांनी आभार मानले आहे.

Post a comment

 
Top