web-ads-yml-728x90

Breaking News

सोशल मीडिया सोडणार नाहीत पंतप्रधान मोदी

BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी सोशल मीडिया सोडण्यासंदर्भात ट्विट केले होते. मात्र आता त्यांनी या ट्विटवर खुलासा केला आहे. मंगळवारी पंतप्रधानांनी ट्विट केले यामध्ये त्यांनी लिहिले की, ज्या महिलांनी मला प्रेरित केले त्यांनाते आपले अकाउंट समर्पित करणार आहेत. महिला दिवसाच्या निमित्ताने हे कँपेन चालवले जाणार आहे. यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकते.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी दुपारी ट्विट केले की, 'ज्या महिलांच्या कामामुळे आणि जीवनामुळे मी प्रेरित झालो आहे अशा महिलांना मी माझे सोशल मीडिया अकाउंट सोपवणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने हे कँपेन चालवले जाईल. त्या लाखोंना प्रेरित करण्यासाठी हे मोटिव्हेट करेल'पुढे लिहिले की, 'तुम्ही त्या महिला आहात किंवा तुम्हाला अशी कोणती महिला माहिती आहे का जिने तुम्हाला प्रेरित केले असेल?' तुमची अशीच कहानी येथे शेअर करा #SheInspiresUs सोबत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोशल मीडिया संदर्भात अत्यंत महत्त्वाचे ट्विट केले होते. या ट्विटने सर्वांनाच धक्का बसला होता. पंतप्रधान आता सोशल मीडियाला रामराम ठोकणार अशा चर्चांनाही सुरुवात झाली होती. पंतप्रधान म्हणाले होते की, 'येत्या रविवारपासून मी सोशल मीडिया सोडू शकतो. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्युब येथील सगळ्या अकाऊंट्समधून बाहेर पडून ही अकाऊंट्स बंद करू इच्छितो' असे पंतप्रधा मोदी म्हणाले. याविषयी येत्या रविवारी मी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले आहे.

No comments