web-ads-yml-728x90

Breaking News

सुधाकर निवृत्ती आलदर यांना हिंदरत्न राष्ट्रीय किताब प्रदान ....!

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्य क्रीडा अधिवेशन २०२०हिंदरत्न राष्ट्रीय किताब मास्टर चंदगीराम राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार दिनांक. २८ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी ३ वाजता शाहू स्मारक, दसरा चौक, कोल्हापूर, जि. कोल्हापूर (महाराष्ट्र) / कुस्ती महर्षी डी. आर. (आण्णा) जाधव क्रीडानगरी मध्ये प्रमुख अतिथि मा. नितेश राणे (आमदार : कणकवली), मा. निलोफर आजरेकर (महापौर : कोल्हापूर महापालिका), मा. संजय मोहिते (उपहापौर : कोल्हापूर महापालिका), मा. पै. दीनानाथ सिंह (हिंदकेसरी मल्ल : कोल्हापूर),  मा. संग्राम चौगुले, (आंतराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू : कोल्हापूर), मा. गणपतराव पाटील (चेअरमन : श्री दत्त साखर कारखाना) या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी तायक्वान्दो प्रशिक्षक सुधाकर निवृत्ती आलदर यांना त्यांनी क्रीडा क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल तायक्वान्दो या खेळासाठी हिंदरत्न (शेर-ए-हिंदुस्तान) हा राष्ट्रीय किताब बहाल करण्यात आला. त्यांच्या कला , त्यांचे कर्तव्य आणि गुणवत्तेला प्राधान्य देवूनच उमेदवारांचे गुणांकन केल्याचे निवड समितिने जाहिर केले.महाराष्ट्रातून तसेच विविध क्रीडा स्तरांवर या सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

No comments