web-ads-yml-728x90

Breaking News

दि.२५ मार्च २०२० ची सुधारित अधिसूचना : राज्यात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
कोविड 19 (कोरोना विषाणूयाचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 14 एप्रिल 2020          पर्यंत लॉकडाऊनकरण्याची अधिसूचना शासनामार्फत जारी करण्यात आली आहे.या कालावधीत राज्य शासनाचे विभाग आणि कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रम हे फक्त अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच कार्यरत राहतील. सर्व शैक्षणिक, प्रशिक्षण, संशोधन आणि मार्गदर्शक संस्था बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवापुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापना यांना पुढील निर्बंधातून सूट देण्यात आलीआहे.
 पोलीस, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, अग्निशमन आणि अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि कारागृह, मंत्रालय, जिल्हा प्रशासन, लेखा व कोषागार, वीज, पाणी आणि स्वच्छता, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पाणीपुरवठा व स्वच्छता याच्याशी संबंधित कर्मचारी, वाणिज्य दूतावास आणि परकीय संस्थांची कार्यालये, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा आणि अन्न व औषध प्रशासन या कार्यालयांमधील अत्यावश्यक सेवा. मंत्रालय, शासकीय कार्यालये तसेच सुरू ठेवण्यात येणारी दुकाने आणिआस्थापना यांनी किमान कर्मचारी वर्ग असण्याची आणि परस्परांपासूनकिमान अंतर राखण्याची (जसे चेक आऊट काउंटरवर तीन फुटाचे अंतरराखण्यासाठी जमिनीवर खुणा करणेदक्षता घ्यावी. त्याचबरोबर स्वच्छता राखली जाईल याचीही दक्षता घ्यावी. इतर कार्यालये वर्क फ्रॉम होम सुरू ठेवू शकतील. अधिकारी आणि कर्मचारी यांनी आकस्मिक सेवेसाठी ऑन कॉल उपस्थित राहावे.अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता संबंधित जिल्ह्यातील सक्षम प्राधिकाऱ्यांनी घ्यावी.या आधी वेगवेगळ्या प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले आदेश हे या आदेशांशी सुसंगती राखून अंमलबजावणी संस्था लागू करतील.

No comments