web-ads-yml-728x90

Breaking News

देशभरात जनता कर्फ्यूला सुरुवात;ठाणे जिल्हासह मुरबाड मध्ये ही सुकसुकाट मुरबाडकरांनी दिला जनता कर्फ्युला प्रतिसाद

BY – गौरव एन.शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. भारतामध्ये 260 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर महाराष्ट्रामध्येही 63 लोक कोरोनानं बाधित आढळले आहेत. भारतात आज जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होतं. कोरोनावर मात करण्यासाठी आज भारतामध्ये जनतेकडून कर्फ्यू पाळण्यात येत आहे.कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून सामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा बंद करण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्रासह तेलंगण, गुजरात मध्यप्रदेश अशा आठ राज्यांच्या आंतरराज्य एसटी फेऱ्या बंद आज बंद असणार आहेत. यासोबतच तसेच गो एअर त्यांच्या सर्व सेवा बंद ठेवल्या जाणार आहे. इतर कंपन्याचेही काही उड्डाणे रद्द करणार आहेत. यामुळे मुंबईहून 200 पेक्षा अधिक विमाने रद्द केली जाणार आहेत. यासोबतच राज्यातील सर्वच शहरातील बाजार पेठाही बंद राहतील. तसेच ठाणे जिल्हासह मुरबाड मध्ये ही शुकसुकाट असुन मुरबाडकरांनी जनता कर्फ्युला प्रतिसाद दिला आहे.

No comments