web-ads-yml-728x90

Breaking News

" मीच माझा रक्षक" कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युवा महाराष्ट्र लाइव्ह वृत्तवाहिनींच्या माध्यमातून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले नागरिकांना मार्गदर्शन


BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव्ह  – ठाणे |
आज कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव पाहिले असता केंद्र  व महाराष्ट्र राज्य  सरकार नागरिकांच्या संरक्षणासाठी भारताची खरी ताकद संपुर्ण जगाला दाखवून देत आहेत.21 दिवसांचा लॉकडाऊन मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी जाहिर केले असून नागरिकांना घरीच थांबा आणि सहकार्य करा असे आवाहन करण्यात आले आहे त्या आवाहनाला नागरिकांनीही चांगल्या पध्दतीने सहकार्य केले आहे.सरकारने संपुर्ण जबाबदारी  हि जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी वर्गांना सोपविली आहे.हि जबाबदारी प्रत्येक जिल्हयाच्या जिल्हाधिकारी व अधिकारी वर्गांनी नायक भुमिकेतून निभावतांना दिसत आहेत.अशीच भुमिका प्रशासकीयेतून गोरगरिबांचे देवदूत ठरलेले ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी साकारली आहे.कोरोना यायच्या अगोदर नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रात्री 8 वाजेपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातच असायचे आता तर जबाबदारी वाढली असून ग्रामीण भागातील नागरिकांनी ठाणे जिल्हाधिकारी यांनी निराशा व्यक्त न करता अधिकारी काय असतो आणि कार्य कसे केले जाते हे राजेश नार्वेकर यांच्या कार्यातून दिसून येत आहे.संचारबंदी लागू करण्यात आली असून याचे काटेकोरपणे नागरिकांनी पालन करावे कारण आपणच सांगू शकता मग," मीच माझा रक्षक " असे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आमच्या युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या माध्यमातून तमाम जनतेशी संवाद साधतांना केले आहे.

राजेश नार्वेकर यांचे कालावधीत विविध सामाजिक कार्य : -
ठाणे जिल्हाधिकारी यांचे विरोधात आज विविध जरी लिखाण केले गेले असले तरी नागरिकांना माहिती आहे कि,खरा देवदूत हा रक्षककर्ताच असतो.आणि म्हणूनच राजेश नार्वेकर यांचे कालावधीत विविध कार्ये झाले,शासनाच्या योजना तळागळात पोहोचल्या,युवकांसाठी कौशल्य योजनांचा लाभ,तसेच वृध्दांसाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला.सामाजिक कार्य अशा अनेक केलेल्या कार्यांचा लेखाजोखा त्यांच्या समाजसेवि कार्यातून सांगून जात आहे.

ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या सुचना व आदेश तसेच कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना केले संबोधित : -
ठाणे जिल्हाधिकारी 25 अन्वये पोट कलम 2(अ) नुसार जिल्हादंडाधिकारी उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष स्थानी आहेत त्यामुळे नियम 10 नुसार त्यांना नियमांची अंमलबजावणी करण्याकरिता सक्षम अधिकारी म्हणून घोषित केले आहे.त्या सक्षमीपणाची ताकद काय असते हे ठाणे जिल्हयाला जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आत्ताची परिस्थिती भयानक असतांना त्यांच्या उपाययोजनेतून सिध्द करून दिली आहे.सर्व प्रथम कोरोनामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन केले तद्नंतर शासनाच्या अधिन असणार्‍या विविध उपाययोजना आखून अत्यावश्यक बाबींच्या सुचना तसेच आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेशजी नार्वेकर यांनी संबंधित तहसिलदार,तलाठी,अधिकारी वर्ग यांना दिल्या आहेत.

ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची ठाणे जिल्हयाच्या प्रत्येक भागात करडी नजर : -
ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची ठाणे जिल्हयाच्या प्रत्येक भागात करडी नजर आहे.आरोग्य विषयक पाहता खाजगी रूग्णालये आत्ताच्या परिस्थितीत बंद केले गेले असल्याचे निदर्शनास आले होते त्यामुळे नागरिकांची गैरसोय हि होत होती परंतू जे रूग्णालये नोंदणीकृत,वैद्दयकीय मान्यता प्राप्त,तसेच औषधे दुकाने,यांची आस्थापणे चालू करण्याचे आदेश दिले आहेत.त्याचबरोबर भाजीपाला घेण्यासाठी एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे,अतिदक्षता घेऊन गर्दी टाळावी,गृहनिर्माण संस्थेच्या गेटजवळ सॅनिटायझरर्स ठेऊन प्रवेश करणार्‍या  व्यक्तीला हात  स्वच्छ करूनच सोसायटीमध्ये प्रवेश देण्यात यावे,भाजीपाला वैगेरे अत्यावश्यक सेवा सोसायटीच्या गेटवरतीच मागवून घेणे,सोसायटीतील सिक्युरिटी मार्फत त्या त्या घरातील एका व्यक्तीस सामान वाटप करणे,क्लब हाऊस,बगीचा येथे लहान मुले एकत्र येणार नाहीत याविषयी दक्षता घ्यावे असेही पत्राद्वारे संबंधित अधिकारी,विभाग प्रमुखांना कळविण्यात आले आहे.

ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे अधिपत्याखाली अन्नधान्य वितरणासाठी नियंत्रण समिती गठण : -
ठाणे जिल्हयात संचारबंदी जाहीर केल्याने ग्रामीण भागामध्ये अन्नधान्याचा व जीवनावश्यक बाबींचा पुरवठा सुरळीत होणे आवश्यक आहे.त्या अर्थी ठाणे जिल्हाधिकारी राजेशजी नार्वेकर यांनी ठाणे जिल्हयात अन्नधान्य पुरवठा सुरळीत होण्याचे आदेश देण्यात आले त्याचबरोबर अन्नधान्याचा उपलब्ध असून कोणीही अन्नधान्याची साठेबाजी किंवा वाढीव दराने विक्री करू नये याकरिता कोरोना प्रतिबंधासाठी गावपातळीवरील यंत्रणेतून ग्रामस्तरीय अन्नधान्य वितरण नियंत्रण समिती गठित केली आहे त्यामध्ये संबंधित तलाठी,कृषि सहाय्यक,ग्रामसेवक,पोलीस पाटील,सचिव,विविध कार्यकारी सोसायटी,सचिव महिला बचत गट,महिला बचत गट ग्राम संघ अध्यक्ष,अंगणवाडी सेविका,आरोग्य सेवक,आशा कार्यकर्ती असे गठित केलेले पदाधिकारी व शासकीय कर्मचारी यांचा सहभाग आहे.तसेच सदर समितीने गावामध्ये गर्दी न होणे,आवश्यक त्या उपाययोजना करणे,जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा वाढीव दराने विक्री न होऊ देणे,दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावाने करण्यात यावी, भाजीपाला, अन्नधान्य,दूध,खते, औधषे,बियाणे व्यवस्थित पुरवठा होत असल्याबाबत खातरजमा करावे तसेच धान्याची साठेबाजी किंवा वाढीव दराने विक्री करतांना कोणीही आढळून आल्यास संबंधित तहसिलदार यांचेशी दररोज आढावा घेऊन अवगत करण्याच्या सुचनाही ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व ठाणे जिल्हयातील तहसिलदार व संगठीत केलेल्या तलाठी व कर्मचारी,पदाधिकारी यांना दिल्या आहेत.

विटभट्टीवरील स्थलांतरीत मजुरांना निवासाची व्यवस्था करण्याच्या दिल्या जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सुचना :- ठाणे जिल्हयामध्ये वीटभट्टी,बांधकाम,सुतारकाम इत्यादी रोजंदारीवर काम करणारे मजुरांची संख्या मोठया प्रमाणावर असल्याने त्यांच्या सुविधेबाबत योग्य त्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.इतर जिल्हयातून या जिल्हयात काम करण्यासाठी मजुर आले असताना त्यांच्या जिल्हयात सध्या स्थलांतरित होणे अशक्य आहे.अशा माणूसकीची जान असलेल्या ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्या मजुरांना त्याठिकाणी निवासाची व्यवस्था करण्याची बाब अवश्यक असुन त्यांची व्यवस्था जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपालिका यांचे शाळेत करण्याच्या सुचना दिल्या आहेत अशा मजुरांचा शोध घ्यावा असे संपुर्ण ठाणे जिल्हयातील संबंधितांना कळविण्यात आले आहे.

खाजगी दवाखाने बंद ठेवल्यास कारवाई : - काही खाजगी दवाखाने बंद रहात आहेत याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर जिल्हा प्रशासन कारवाई करू शकते याची जाणीव डॉक्टरांनी ठेवावी. त्यामुळे दवाखाने बंद ठेवू नयेत. जर कोणी खाजगी डॉक्टर त्यांचे दवाखाने बंद ठेवत असतील व त्याचे पुरावे प्रशासनाला मिळाले तर प्रशासन त्यांच्यावर कठोर कारवाई करेल असा इशारा श्री नार्वेकर यांनी दिला आहे.


फोनवर रिक्षा सेवा : - आजारी व्यक्तींना दवाखाण्यात जाण्यासाठी संचारबंदी च्या काळात वाहन सेवा नसल्याने अनेकदा त्यांची गैरसोय होते आहे. हे लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने फोनवर रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्व प्रभागांमध्ये रिक्षा संघटनेशी चर्चा करून शहरात विविध ठिकाणाहून २५अबोली महिला  रिक्षाचालक व त्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात येणार आहेत. त्यांना फोन करून बोलविता येईल. याचा निश्चितच फायदा होईल असे श्री.नार्वेकर यांनी सांगितले


ठाणे जिल्हाधिकारी राजेशजी नार्वेकर यांचे कामाची तुलना कोणीही करू शकणार नाही, चोराच्या उलटया बोंबा मारतात अधिकारी वर्गांना समजून घ्या : - या सगळयांवर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी करडी नजर ठेऊन जे काम करायला हवे त्यापेक्षा किती पट्टीने कार्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे तरी काही लोकांनी जिल्हाधिकारी यांचे नाव बदनामीकारक वृत्तीने मॅसेज पसरविले असल्याचे निदर्शनास आले आहे.प्रत्येकाला कुटूंब आहेच तसेच जिल्हाधिकारी यांनाही कुटूंब आहे तरी देखील जेनतेसाठी आणि त्यांच्या कुटूंबासाठी कार्य करतांना पाहत आहे.स्वतःच्या घरी कमी वेळ देत असून संपुर्ण जिल्हयाकडे बारकार्इने लक्ष देणारे जिल्हाधिकारी राजेशजी नार्वेकर यांचे कामाची तुलना कोणीही करू शकणार नाही हे सर्वांना  ज्ञात आहे परंतु ज्यांना ज्ञात नाही आणि चोराच्या उलटया बोंबा मारतात,व जे अधिकारी वर्गांना समजून न घेता आत्ताच्या परिस्थितीवर शिंतोडे उडवतात त्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय अधिकारी यांना सहकार्य केले पाहिजे.माणसं जोडायला शिकलं पाहिजे तोडायला नाही तसेच ठाणे जिल्हाधिकारी राजेशजी नार्वेकर सक्षम आहेत म्हणून ठाणे जिल्हा महाराष्ट्रात पुढे आहे याचीही माहिती ध्यानात घ्यायला हवी.


No comments