web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड नगरपंचायतीच्या सर्व प्रभागामध्ये सर्व प्रभागामध्ये जंतुनाशक फवारणी ; लोकांच्या आरोग्यावर मात करण्यासाठी भाजपा सरसावली - शितलतार्इ तोंडलीकर


BY – गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड नगरपंचायतीच्या प्रभाग क्र.07 च्या नगरसेविका तथा माजी नगराध्यक्षा शितलतार्इ तोंडलीकर त्यांचे पती दिनेश तोंडलीकर यांनी आपल्या प्रभागासह सर्वच प्रभागात जंतुनाशक फवारणी केली आहे.
          लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वत्र स्वच्छता नगरपंचायतीच्या फायरब्रिगेड वाहनामधून डास फवारणी,स्वच्छता मोहिम सुरू केली त्यामध्ये सर्व नगरपंचायत कर्मचारी नगरसेवक यांचाही समावेश आहे.  गोरगरिबांना मोफत जेवण त्यांची राहण्याची सोय,सॅनिटायझर,मास्क वाटपाची सोय माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे,आरोग्य सभापती नारायण गोंधळी,माजी नगराध्यक्षा शितलतार्इ तोंडलीकर यांनी केली आहे.त्यांच्या सोबत नगरसेवक नितनि तेलवणे,रविंद्र देसले,हमीद पानसरे,सुजित ठाकरे व अन्य नगरसेवक आपआपल्या प्रभागात नागरिकांना स्वच्छता मोहिम राबवून अन्यधान्याची औषधांची मदत करत आहेत.
          स्वच्छता मोहीम यापुढे कायम स्वरूपी राबविली जार्इल असे माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे,आरोग्य सभापती नारायण गोंधळी यांनी आमच्याशी बोलतांना म्हंटले आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात स्वतंत्र भाजीपाला मार्केट उभे केले असून नागरिकांनी गर्दी करू नये,काहीही अत्यावश्यक सेवा कमी पडू देणार नाही असे माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे,नारायण गोंधळी,माजी नगराध्यक्षा शितलतार्इ तोंडलीकर,दिनेश तोंडलीकर यांनी युवा महाराष्ट्र लार्इव्ह व स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्राशी संवाद साधतांना म्हंटले आहे.


No comments