0

BY – भाऊ कदम,युवा महाराष्ट्र लाइव – नेवासा |
कोरोना व्हायरस मुळे अनेक हातमजुरांवर स्थलांतराची वेळ आली आहे अशाच मध्यप्रदेशातील असलेल्या व महाराष्ट्रात मोलमजुरी करुन पोट भेटणारे  असंख्य लोक रस्त्याने पायपीट करत  फिरताना दिसतात..
    असच आज दोन कुटुंब आज नेवासा शिवारातील श्रीरामपुर रोड वर दिसले. शेकडो  किलोमीटर पायपीट करुन जायचंय अस त्यांच्या चौकशी केल्यावर समोर आले त्यात महिला लहान लहान मुल पुरुष यांच्या खाण्या पिण्याची काहीच व्यवस्था नसल्याचे दिसून आले व त्यानंतर त्याची पानी,नाष्टा व एक वेळचे जेवन अशी मदत सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले
आपण समाजाचे देणं लागतो या भावनेतून  जमेल त्या स्वरुपात निराधार लोकांना मदत करुन मानुसकीचे दर्शन घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असे आवाहन बाळासाहेब कोकणे यांनी केले आहे


Post a comment

 
Top