web-ads-yml-728x90

Breaking News

जालन्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट

BY – युवा महाराष्ट्र लाइव – जालना |
एमआयडीसीत असलेल्या ओम साईराम स्टील कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात चार कामगारांचा भाजून जागीच मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. या स्फोटाची तीव्रता एवढी भयानक होती. की आजुबाजूचा सर्व परिसर स्फोटामुळे हादरून गेला होता. ओम साईराम ही स्टील कंपनी दिनेश भारुका यांच्या मालकीची आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. नेमका स्फोट कशामुळे झाला, हे अद्यापही समोर आलं नाही. पोलिसांकडून सुद्धा कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळालेली नाहीये.

No comments