0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
जगभरात आज महिला दिन साजरा केला जात आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. यासोबतच त्यांनी आपले सोशल मीडिया अकाउंट सात महिलांना समर्पित केले आहे. #SheInspiresUs हे हॅशटॅग टाकत त्यांनी सुरुवातीला स्नेहा मोहनदास यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवातीला महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, आम्ही नारीशक्तीच्या भावना आणि कामगिरीला सलाम करतो. मी काही दिवसांपूर्वी म्हणालो होतो की, मी सोशल मीडिया अकाउंट बंद करत आहे. सात महिला आपल्या जीवनासंबंधीत कहाणी सांगतील आणि माझ्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून तुमच्यासोबत बातचित करतील. भारतातील सर्वच राष्ट्रात महिलांनी चांगली कामगिरी केली आहे. या महिलांनी अनेक क्षेत्रांमध्ये शानदार काम केले आहे. त्यांचा संघर्ष आणि आकांक्षा लाखो लोकांना प्रेरित करतात. आपण अशा महिलांच्या कामगिरींचा उत्सव साजरा करु आणि त्यांच्यापासून काही तरी शिकूया.' असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

Post a comment

 
Top