web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबईत प्‍लास्टिक वापरणाऱ्यांवर कडक कारवाई, आदित्य ठाकरेंचे पालिकेला निर्देश

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंधित प्‍लास्टिक वापरावर आज 1 मार्चपासून कडक कारवाई करण्‍याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.मुंबईतील नागरिक, व्‍यापारी, फेरीवाले यासह‍ सर्वांनी प्रतिबंधित प्‍लास्टिकचा वापर करु नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.जून 2018 पासून आजपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात सुमारे 16 लाख आस्‍थापनांना भेटी देऊन जवळपास 86 हजार किलो प्‍लास्टिक जप्‍त केले आहे. तर, सुमारे 4 कोटी 65 लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्‍यात आला आहे. राज्‍याचे पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे यांनी महाराष्‍ट्रात प्रतिबंधित प्‍लास्टिकचा वापर रोखण्‍यासाठी कारवाई तीव्र करण्‍याचे निर्देश दिले आहेत. मे 2020 पर्यंत संपूर्ण महाराष्‍ट्र प्रतिबंधित प्‍लास्टिक मुक्‍त करण्‍याचे लक्ष्‍य निश्चित करण्‍यात आले आहे.
-        1 मार्चपासून पुन्हा प्लास्टिक बंदी -

महाराष्‍ट्र शासनाच्‍या अधिसुचनेनुसार संपूर्ण महाराष्‍ट्रात पुन्हा प्‍लास्टिक बंदी करण्यात आली आहे. या अंतर्गत प्‍लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या प्‍लास्टिकपासून बनवण्यात येणार्‍या आणि एकदाच वापरल्या जाणार्‍या टाकाऊ वस्तू यावर बंदी घालण्यात आली आहे. प्रतिबंधित प्‍लास्टिक आढळल्यास, प्रथम गुन्ह्यासाठी 5 हजार रुपये, दुसर्‍या गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये, तिसर्‍या गुन्ह्यासाठी 25 हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेची कतरतूद करण्यात आली आहे.

No comments