web-ads-yml-728x90

Breaking News

महाराष्ट्रातील चार कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार प्रदान

BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
ललित कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्रातील चार कलाकारांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.सोलापूर येथील तेजस्विनी सोनवणे आणि मुंबई येथील सागर कांबळे, रतनकृष्ण साहा, दिनेश पांड्या यांना यावेळी राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात 61 व्या राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल, मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी  आणि  ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यावेळी उपस्थित होते.61 व्या राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कारासाठी  देशभरातून 5 हजार कलाकारांचे अर्ज  प्राप्त झाले होते. यातील 15 सर्वोत्कृष्ट कलाकारांची निवड करून त्यांना समारंभात सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार कलाकारांना यावेळी गौरविण्यात आले. 2 लाख रूपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.तेजस्विनी सोनवणे यांना प्रिंट मेकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. तेजस्विनी सोनवणे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठाच्या फाईन आर्ट महाविद्यालयातून बॅचलर ऑफ फाईन आर्टचे तर मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथून मास्टर ऑफ फाईन आर्टचे शिक्षण पूर्ण केले. मुंबई, दिल्ली, पटना, कोलकाता, भुवनेश्वर, खजुराहो येथील चित्रप्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला. 2017 मध्ये दक्षिण कोरियातील बुसान शहरात आयोजित आंतरराष्ट्रीय आर्ट फेअरमध्येही त्यांनी सहभाग घेतला आहे.

No comments