0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
कोरोना व्हायरस बाबत खबरदारीचा उपाय म्हणून आता पुण्यातील दगडुसेठ हलवाई, आणि कसबा गणपती यांचे दर्शन बंद करण्याचा निर्णय दोन्ही मंदिर समित्यांनी घेतला आहे. या निर्णयाचे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. पुण्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. सध्या देशासह राज्यात कोरोना व्हायरसने आपले पाऊल टाकण्यास सुरूवात केली आहे. याच गोष्टीची दक्षता घेऊन आता पुण्यातील दगडुसेठ हलवाई आणि पुण्याचे ग्रामदैवत असलेले कसबा गणपती मंदिरातील दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Post a comment

 
Top