0
BY – गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
गेल्या काही दिवसांपासून भारत वॉर्इन शॅपच्या बनावटी दारूची कहानी सुरू केली असून त्या कहानी प्रकाशनात कोणत्याही प्रकारे चौकशी न करता किंवा दखल न घेतल्याने उत्पादन शुल्क विभागाचा पाठिंबा असल्याचे संकेत दिसून येत आहे.परंतू बनावटी दारूची बातमी प्रसिध्द होता मन्नुभार्इच्या बनावटी दारूच्या बाटल्यांची कंपनी प्रिंट बदलण्यात आली आहे.मन्नुभार्इच्या दारूची मोटार ही पम पम पम करू लागल्याने बिलाची टक्केवारी मात्र कायमच राहिली की काय असा सवाल केला जात आहे.राजकारणी समर्थकाने यात हस्तक्षेप केला असून पार्टनर म्हणून मॅनेज भुमिका मात्र,त्या साहेबांच्या समर्थकांनी निभावण्यास घेतली आहे.त्यातच मन्नुभार्इ नगरपंचायतीच्या इमारतीत बसला कसा या प्रश्‍नाचे उत्तर अद्दयाप तरी गुलदस्त्यातच आहे.याच मन्नुभार्इच्या बनावटी दारूचे अनेकांचे बळीही गेल्याची शंका नाकारता येणार नाही.तळीने बळी जरी घेतला असेल तरी चौकशी अंतिम प्रकरण दाबण्यात आला असेल असाही सुर सध्या उमटत आहे.वरिष्ठांपासून खालपर्यंत मॅनेज अधिकार्‍यांना हप्ता तर दारू महिण्याला परविल्या जात आहेत.अलीकडे शाळा त्यातच परिसरात राहणार्‍या नागरिकांना येथील जमा दारूडयांचा हौदास त्रासदायक होत आहे.अनेकांनी बातमी प्रसिध्द झाल्यानंतर युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या लेखणीचे कौतूक करत त्या मन्नुभार्इच्या दुकान बंद करण्यासाठी काही सामाजिक संघटना,पक्ष कार्यकर्ते,नागरिकांनी वरिष्ठांना पत्रव्यवहार करणार असल्याचे आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.त्यामुळे मुन्नुभार्इच्या बनावटी दारूवर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून तरूण,ज्येष्ठ व्यक्तींना व्यसन मुक्त होण्याच्या दृष्किोणातून भारत वॉर्इन शॉप बंद करण्याच्या मागणीचे हालचाली सुरू केले असल्याचे कळून आले आहे.ट्रकच्या ट्रक बनावटी दारू खुलेआम नगरपंचायत इमारतीत खाली केल्या जात असून उत्पादन शुल्क विभाग मात्र मुक गिळून गप्प बसले आहे.
मन्नुभार्इच्या गोडाऊनमध्ये होळी आणि धुलीवंदन च्या दिवशी पडेल बनावटी दारूचा पाऊस

त्यातच होळी आणि धुलिवंधन सण उद्दयापासून सुरू होत आहे.या सणात दारूसाठी मन्नुभार्इच्या दुकानात तुफान गर्दी होणार आणि बनावटी दारू संपविल्या जाणार,त्यासाठी कदाचित मन्नुभार्इ बनावटी दारूचा स्टॉक हा वाढवला जार्इल अन खुलेआम विक्री करेल तरीही उत्पादन शुल्क कोणत्याही प्रकारे चौकशी करणार नाही हे मात्र,नक्कीच.पहिले बाजारपेठेत बसलेला मन्नु हा नगरपंचायतीच्या इमारतीत आला अन दारूच्या बाटल्या वाढल्या,कोपर्‍यात दुकान मांडून मनासारखे बनावटी दारू विक्री करून कोणत्याही ग्राहकाला बिले न देता शासनाच्या कराला बुडविले जात आहे.अलीकडे मन्नुभार्इचा राजकीय पार्टनर हा उत्पादन  शुल्क विभागाला तर मॅनेज करत नाही ना अशी शंका वाटू लागली आहे. 

Post a comment

 
Top