0
BY – गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
पहिले मुरबाड शहरात दारू पिणारे कमी होते परंतू अलीकडे मन्नुभार्इ मुरबाडला लाभल्याने दारूचा पूर उतु चालू झाला.त्यातच बनावटी दारू बरोबर काही कंपनीच्या दारू विक्री करत असल्याने दारू पिणार्‍यांची संख्या वाढली आहे.दारूची चटक लागल्याने मन्नुभार्इच्या भारत वॉर्इन शॉपवर दारू घेण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे.याच गर्दीच्या बहाण्यात मन्नुभार्इच्या दुकानात काही अधिकारी वर्ग,नागरिक पाहायला मिळत आहे.कालपर्यंत तरूणांना दारू माहित नव्हती अशा मन्नुभार्इच्या दारूवर सकाळपासून तरूणवर्ग निदर्शनास दिसू लागले आहे त्यामुळे दारू पिण्यासाठी मन्नुभार्इचा दारूचा अड्डा हा फेमस होत आहे.विविध दारूचा स्ट्रॉक मुरबाड नगरपंचायतीच्या  इमारतीच्या गोडावूनमध्ये खाली होतात.पलीकडे विद्दयार्थ्यांची शाळा तर अलीकडे मंदिर,शासकीय कार्यालये दिसून येतील  अशा वेळी दारूडे काही वेळा धुमाकुळ घालतात याचा त्रास आजू बाजू परिसरातील नागरिकांना होत असल्याची चर्चा सध्या उमटू लागल्या आहेत.त्यावर उत्पादन शुल्क विभाग अधिकारी महिण्याला काय तपासणी करतात असा सवाल येथिल नागरिकांनी केला आहे.याच मन्नुभार्इच्या दारूच्या दुकानासमोर कित्येक भांडणे दारू पिऊन केल्या गेल्या आहेत या भारत वॉर्इन शॉपला बंद करण्याची  मागणी केली असूनही शासकीय अधिकारी मन्नुभार्इच्या पाठिशी राहून मुक गिळून गप्प आहेत.कारवार्इ करण्याएैवजी कानाडोळा करित आहे त्यामुळे कारवार्इ ही शुन्यच राहिली आहे.दारूच्या विक्रीवर नागरिकांना बिले नाहीत,त्यातच जी.एस.टी अशावेळी मन्नुभार्इ फायदा मिळविण्याकरिता राजकीय समर्थकाचे पार्टनर म्हणून नाव पुढे करतो व गल्लीबोळातील भार्इ म्हणून वागणार्‍यांना उड्डानटप्पुने आपली दहशत दारूडयांवर करतो.राजकीय समर्थक जेव्हा बनावटी दारूमध्ये पार्टनर होतो तेव्हा खर्‍या अर्थाने दोन नंबरी धंदे यांचेच हे उघडकीस येते.तक्रारदाराच्या तक्रारीला शासन केराची टोपली  दाखवत असून मन्नुभार्इच्या दारूबरोबर त्या अधिकार्‍यांची सर्वप्रथम स्वतंत्र पथक नेमूण चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे.या भारत वॉर्इन शॉपचा धंदा उल्हासनगर येथेही सुरू असल्याची चर्चा असून मुरबाडमध्ये बनावटी दारूचा पाऊस पडला असून उल्हासनगर शहरात हा किती बनावटी प्रकरणे करत असेल याचा अंदाज लावणे कठीणच आहे.अशा मन्नुभार्इच्या त्या भारत वॉर्इन शॉपची सखोल चौकशी करून भारत वॉर्इन शॉप बंद करण्याची मागणी विविध संघटनानी केली आहे. 
येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना मद्दयप्राशन करणार्‍यांचा होतोय नाहक त्रास...
भारत वॉर्इन शॉपच्या दुकानाशेजारी मद्दयप्राशन करणारे दारूडे बाजूला उभे राहून दारू पितात याचा येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना नाहक त्रासदायक ठरत आहे.संध्याकाळची वेळ ही दारूडयांची मन्नुभार्इच्या दुकानाशेजारी दारू पिण्याची असते.यावर भारत वॉर्इन शॉप दारू पिण्यास प्रोत्साहन देत असल्याचे चित्र पाहायला दिसत आहे.अशा सार्वजनिक ठिकाणी दारूडयांचा धिंगाणा होत असल्याने पुढील कोणतेही अपकृत्य घडल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

Post a comment

 
Top