0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महिला सक्षमीकरण, संरक्षण तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत आहे. माता व बालकांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये खासगी उद्योग (कॉर्पोरेट) क्षेत्राने सहयोग देण्याचे जाहीर अभिवचन शासनाला दिले.जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रम झाला. 
कार्यक्रमास महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी- शर्मा, कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या इंडियन वुमन नेटवर्कच्या (सीआयआय-आयडब्ल्यूएन) अध्यक्षा श्रीमती अनिता मधोक, वरिष्ठ पत्रकार तथा सिटीजन अगेन्स्ट मालन्युट्रीशन या संस्थेच्या नीरजा चौधरी यांच्यासह कार्पोरेट क्षेत्रातील 30 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top