web-ads-yml-728x90

Breaking News

श्रीसमर्थ सुपर बाजारच्या वतीने नागरिकांना मास्क चे वाटप ; मुरबाडकराची साथ असल्याचे प्रदोष हिंदुराव यांनी केले पुन्हा सिध्द

BY – कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कटिबध्द पाऊल उचलेले असून संचारबंदी लागू केली आहे.त्यामुळे अजुन 21 दिवस संचारबंदी लागू करून लॉकडाऊन जाहिर केले आहे.सध्या नागरिक घरा बाहेर पडत नसून शासनास सहकार्य करत आहे.परंतु शासनानी अत्यावश्यक वस्तु मिळणार असल्याचे घोषित केले असताना ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यात मुरबाड नगरपंचायतीने ठरविलेल्या टार्इम प्रमाणे नागरिकांना भाजीपाला,दूध,किराणा वस्तु नागरिकांना उपलब्धतेत मिळतात.त्याचप्रमाणे म्हसा रोड लगत असणारा श्रीसमर्थ सुपर बाजार मार्केटही शासनाच्या अटीतटीच्या अधिन राहून नागरिकांना पुरेपूर सेवा देत आहे.या सुपर बाजाराचे प्रमोद हिंदुराव यांचे कडील अत्यावश्यक वस्तु उपलब्ध असल्याने वाजवी दरात वस्तुची विक्री करून नागरिकांना सहकार्य केले जात आहे.सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत श्रीसमर्थ सुपर बाजार नागरिकांना अत्यावश्यक वस्तु सेवा देत असल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.विशेष म्हणजे मुरबाडकरांच्या सेवेसी तत्पर असनारा आणि मानाचा तुरा उभारलेला श्रीसमर्थ सुपर बाजारच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करून अत्यावश्यक वस्तुची खरेदी करण्यासाठी येणार्‍या मुरबाडकरांसाठी प्रवेश करतांनाच सेनिटायझर हातावर दिला जातो व कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नागरिकांची काळजी घेतली जाते कारण आपणच आपले रक्षक आहोत याची जाण करून जाते.श्रीसमर्थ सुपर बाजारचे विेविध वैशिष्टय नागरिकांना भाऊन जाते यावेळीही त्यांना मोफत मास्कचे वाटप करून मुरबाडकराची साथ असल्याचे प्रदोष हिंदुराव यांनी पुन्हा एकदा सिध्द केले आहे.


No comments