BY – गौरव एन.शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मंत्रालय,मुंबई |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या परळ येथील
चाळीतील निवासस्थानी त्यांचे स्मारक येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येईल. तसेच अण्णा भाऊ साठे
यांच्या निवासस्थानीही येत्या दोन वर्षात त्यांचे स्मारक विकसित करण्यात येईल. त्याचबरोबर
मुंबईतील चाळी आणि झोपडपट्ट्यांचा इतिहास लोकांना माहित व्हावा यासाठी यासंदर्भात कॉफिटेबल
बुक प्रकाशित करण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत
केली.
Post a comment