0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जनकल्याण सेवा फाऊंडेशनच्यास वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर  वाचनालय, कोपरी काॅलनी, ठाणे पुर्व येथे ८मार्च या महिला दिनी महाराष्ट्रातील कतृत्ववान महिलांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.प्रथम प्रमुख पाहुण्या समाजसेविका-कांचन गौरी महिला पतसंस्थेच्या माजी संचालिका सेक्रेटरी मिनल गावडे यांच्या हस्ते शिवप्रतिमा व राजमाता जिजाऊ प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात झाली.मिनल गावडे यांनी जनकल्याण सेवा फाऊंडेशनच्या  कार्याची माहीती फाऊंडेशनच्या कार्याची स्तुती करत ८मार्च या महिला दिनाचा उगम कसा झाला व त्याचे महत्व पटवून दीले.तसेच तेजस्विनी क्रीयेशनच्या संस्थापक,ठाणे येथील तेजस्विनी महिला मंडळाच्या व्यवस्थापक सचिव अलका देव्हारे यांनी रामायण,महाभारतातील कतृत्ववान महिलांच्या संदर्भातील दाखले देत महिला सक्षमिकरणाची महिला दिनाची माहिती दीली.याप्रसंगी व्यासपीठावर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन फळणे,सचिव रणधिर सकपाळ महिला आघाडी राज्य अध्यक्षा श्रुती उरणकर, अंकुर उद्योग बिझनेस फोरमच्या राज्य उपाध्यक्षा माधुरी जोशी, राजु शेठ रींगे,निलेश अहीरे दगडु दाभेकर,हेमलता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.याच महिला दिनी फाऊंडेशनच्या पदाधिकारी सुनिता मिश्रा व सन्मानमुर्ती ममता तावडे यांचा वाढदिवस आल्यामुळे तेथेच केक कापून साजरा करण्यात आला. हा एक दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.या कार्यक्रमाचे शब्दबद्ध व उत्कृष्ट सुत्रसंचलन जान्हवी माळवदे यांनी केले.व आभार सचिव रणधिर सकपाळ यांनी मानले. तसेच जनकल्याण सेवा फाऊंडेशनच्या सर्वच महिलांनी आपला खारीचा वाटा उचलत व मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल अध्यक्ष सचिन फळणे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

Post a comment

 
Top