0
BY – गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
सरकारने बनावटी दारू आणि गुटखावर जरी बंदी आणली असेल तरी  प्रत्यक्षरित्या ते अंमलबजावणी नावावर राहिली असल्याचे मुरबाड मध्ये निदर्शनास आले आहे.मुरबाडमध्ये एकीकडे मन्नुभार्इ आणि एक राजकारणी समर्थक पार्टनर बनावटी दारू व्यवसाय चालवतो आणि दुसरीकडे गुटखा डिलर नव्या ढंगात कागदाच्या पुडितुन गुटखा विक्री दुकानदारांना करण्यास सांगतो.मग कुठे अंमलबजावणी केली गेली ? आणि केली असेल तर गुटखा चगळणार्‍यांना गुटखा मिळतो कसा असा सवाल येथिल नागरिकांनी केला आहे.
          मुरबाडचा गुटखा डिलर आणि बनावटी दारूचा मालक,पार्टनर युवकांना व्यसनग्रस्त बनवित आहे यावर प्रशासनानी कोणतीही दखल गांभिर्यतेने घेतली नाही. एकीकडे शासन रोगांवर कारोडो रूपये खर्च करते तर दुसरीकडे गुटखा विक्रींवर व बनावटी दारू विक्रीवर कोणतीही कारवार्इ करण्यास अपयशी ठरली जाते.तक्रारी करूनही चौकशी केल्या जात नाही.हप्तेखोर करणारे अगोदरच त्यांना बचावाचे पर्याय सांगतात त्यामुळे तक्रारदाराचे तक्रारी अर्ज निकाली काढल्या जातात आणि उडवा उडवीची उत्तरे देऊन गैरधंदे करणार्‍याला पाठिंबा देत प्रोत्साहन दिले जाते.गुटखा विक्री मुरबाडमध्ये बंद असल्याचे संकेत दाखविले जात आहे परंतु वास्तविक पाहता गुटखा विक्री मुरबाडमधून बंद झालेले नाही.कधी टपरीवर कचर्‍याच्या डब्यात गुटखा  ठेवला जातो तर कधी लहान मुलांच्या कुरकुरे बॉक्समध्ये गुटखा ठेऊन विक्री केला जात आहे.गुणनियंत्रण विभागासह उत्पादन शुल्क व पोलिस प्रशासन तसेच संबंधित अधिकारी कोणत्याही प्रकारे चौकशी करत नसल्याने बनावटी दारू मन्नुभय्या आणि गुटखा डिलर जोमाने गैरधंदा लपवालपवी पध्दतीने करत आहे. प्रशासनावर बनावटी मन्नु भार्इ,गुटखा डिलर वचक दाखविल कि प्रशासन यांच्यावर असा सवाल केला जात आहे.या दोघांची सखोल चौकशी होण्यासाठी काही संघटनांनी वरिष्ठांना कारवार्इसाठी निवेदन ही देण्यात आल्याचे सुत्रांकडून कळून येत आहे.

Post a comment

 
Top