web-ads-yml-728x90

Breaking News

होळी व रंगपंचमी या निमित्ताने होणा-या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर

BY – युवा महाराष्ट्र लाइव – देवगड |
होळी हा कोकणातील चाकरमान्यांचा पारंपारिक सण.होळी व रंगपंचमी हा सण निर्विवाद व निर्विघ्नपणे व्यवस्थित पार पाडण्याचा सर्वांचा हेतू असतो.पण काही अपप्रवृत्तीच्या व्यक्तींकडून त्याचा गैरवापर केला जातो.महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.
या सर्व गोष्टींचा विचार करुन हा सण शांततेत पार पडावा यासाठी नुकताच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एक निवेदन देवगड तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.याद्वारे होळी व रंगपंचमी हा सण सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे  आवाहन करण्यात आले. हे निवेदन सादर करताना धर्माभिमानी दिपक कांबळी,सर्वश्री शेखर इचलकरंजीकर,अनिरुध्द दहिबावकर,अशोक करंगुटकर,अनंत परुळेकर,विलास इंदोलीकर,सौ.वीणा इंदोलीकर, सौ.नेहा हडकर,कल्पना चव्हाण तसेच इतर हिंदू जनजागृती समिती व सनातन संस्थेचे साधिका व साधक उपस्थित होते.

No comments