0

BY – गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव्ह – बदलापुर |
माणुसकीची झरी  हि काय असते हे महाराष्ट्र पोलिस सर्व नागरिक व त्यांच्या कुटूंबाच्या संरक्षणार्थ अहोरात्र कर्तव्यपरायण भुमिकेतून सांगून जात आहे अशा माणसातल्या माणूसकीला संपुर्ण महाराष्ट्र सलाम करतो व त्यांना सहकार्याची शपथ घेऊन त्यांच्या कोरोना विषाणूला संपुष्टीत लढाइला साथ देतो हे वचन आम्ही स्विकारत आहोत असे परेश खिस्मतराव व प्रमोद गायकवाड यांच्यासह परिवाराने  आमच्या युवा महाराष्ट्र लाइव्ह वृत्तवाहिनींशी बोलतांना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आज बदलापुरात पोलिस व रेल्वे पोलिस बांधवांना यांना परेश खिस्मतराव व प्रमोद गायकवाड यांच्यासह त्यांच्या परिवाराने अल्पहाराचे वाटप केले आहे.
या तरूण युवकांनी महाराष्ट्र पोलिसांना सलाम करत त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी.तुम्ही आमच्यासाठी उणात तापतात मग आम्ही तुमच्यासाठी घरी का नाही थांबु शकत म्हणून लॉकडाऊनमध्ये आम्ही आपल्या सोबत आहोत.
जसे आम्हाला तुम्ही घरी थांबून कुटूंबाची काळजी घ्यावयास सांगतात तसेच महाराष्ट्र पोलिसांनीही काळजी घ्या असे युवा तरूण पिढीचे तडफदार परेश खिस्मतराव व प्रमोद गायकवाड यांनी आमच्या युवा महाराष्ट्र लाइव्ह वृत्तवाहिनीच्या माध्यमातून बोलतांना सांगितले आहे.

Post a Comment

 
Top