0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
सध्या कोरोनोच्या भितीने संपुर्ण देश हादरून आहे.आफवाने सामान्य नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे.त्याला लगाम घालण्यासाठी मुरबाड पोलिस ठाण्यात डीवायएसपी बसवराज शिवपुजे यांनी पत्रकार परिषद घेवुन आफवाना आळा घालण्याचे आहवान जनतेला मिडीयाच्या माध्यमातुन केले आहे.पत्रकार परिषदेत बोलताना डी.वाय.एस.पी बसवराज शिवपुजे यांनी लोकानी धाबरू नये गर्दीच्या ठिकाणी जावू नये हातात हात मिळवू नये स्वच्छता राखावी संशयीत रूग्णांची माहिती प्रशासनाला दयावी मात्र कोणाची आफवा फेसबुक व्हॉटसॉप अन्य माध्यमाने पसरवु नये असेही शिवपुजे यांनी आवाहन केले.बदलत्या हवामानात सर्दी खोकला असे आजार जडतात त्याकडे संशयानी पाहु नये त्यांचा तीरस्कार करू नये चुकीच्या आफवा पसरवणार्‍यावर कायदेशिर कारवार्इ केली जार्इल.लोकात जनजागृती कोरोनासंबधी झाली पाहिजे मात्र डॉक्टरांनी रूग्ण संशयीत घोषित केला नसताना आफवा पसरवणे चुकीचे आहे.प्रशासनाने कोरोनाचे संशयीत रूग्ण आढळल्यास यंत्रणा सज्ज ठेवली आहे.आपल्या परिसरात आपण जनजागृती करून दक्षता घ्यावी असे आहवान डी.वाय.एस.पी बसवराज शिवपुजे यांनी केले आहे.मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाल यांनी सांगितले की,मुरबाडचा आठवडा बाजार बंद करण्यात आला असुन प्रत्येक प्रभागात जनजागृती स्वच्छता फवारणी केली जाणार आहे.ऑफीस,मॉल,हॉटेल,दुकाने बंद करण्याचा निर्णय सुरू आहे.कोरोनावर मात करण्यासाठी घरगुती कार्यक्रम रद्द करा परदेशी नागरिकांची माहिती कळवा असे आहवान जनतेला पत्रकारांच्या मिडीया माध्यमातुन केले आहे.पत्रकार परिषदेत उपस्थित मुद्दयावर जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी आरोग्य विभाग यंत्रणेचा बोजबारा उडाला आहे.खाजगी डॉक्टर संशयीत रूग्ण जाहिर करतात अशा रूग्णांची नोंद सरकारी दप्तरी झाली पाहिजे.स्वतंत्र दोन डॉक्टर,कर्मचारी,दोन अँब्युलेश,स्वतंत्र चार बेडया कक्ष ग्रामीण रूग्णांलयात उभा करावा रूग्णालयांत येणार्‍या सर्व रूग्णांना मोफत मासचे वाटप करावे.प्रत्येक प्रभागात सर्दी,खोकला,ताप,डोकेदुखी,रूग्णांवर जागच्याजागी उपचार करावे,स्वच्छतासाठी सॅनिटायझर वाटप करावे,डास फवारणी करावी, रस्त्यावरची घाण साफ करावी,त्याचबरोबर सरकारी डॉक्टरांनी संशयीत रूग्णांची प्रथम तपासणी लॅब मध्ये करून खरोखरच रूग्ण कोरोना बाधीत आहे का त्याची माहिती पत्रकाराना,मिडीयाला अधिकृत दयावी नुसते आहवान करून लोकांच्या मनातील भिती जाणार नाही त्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी असे प्रश्‍नाचा भडीमार केला.मुरबाडमध्ये कोरोनाचा संशयीत रूग्ण हे वृत्त साफ खोटं आहे.असे प्रशासन सांगतात मग त्या रूग्णांला संशयीत कोणत्या डॉक्टरानी केले मुरबाड मध्ये आपघात अन्य साथीच्या रूग्णांवर खाजगी रूग्णांलयात उपचार केले जातात.त्यांच्या नोंदी शासकीय दप्तरी नाहीत त्यावर कारवार्इ झाली पाहिजे.यावर बोलताना कंकाल मुख्याधिकारी मुरबाड नगरपंचायत यांनी खाजगी रूग्णालयात पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.मुरबाड मध्ये ग्रामीण रूग्णालय मुरबाड मध्ये डॉ.कुलकर्णी डॉ.नरहरी फड डॉ.खंबायत व त्यांच्या सर्व कर्मचार्‍यांनी कोरोना बद्दल दक्षता घेतली आहे.रूग्णांची तपासणी केली जाते मात्र एखादा संशयीत रूग्ण आढळल्यास त्यावर स्वतंत्र प्रथम इलाज करण्यासाठी वैद्यकीय निवासात सोय केली आहे.दोन अँब्युलेश सज्ज असुन मुरबाडच्या वैद्यकीय अधिकार्‍याचा विकासमंचच्या अध्यक्षा सौ.ज्योती शेलार यांनी अभिनंदन केले असुन नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन केले आहे.

Post a comment

 
Top