0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – कोल्हापूर |
चिकन आणि मासे खाल्ल्यानं कोरोनाची बाधा होत नाही, असं ओरडून ओरडून सांगितलं जातंय. मात्र तरीही भीतीपोटी लोकांनी चिकन आणि माश्यांपासून दोन हात लांब राहणंच पसंत केलंय. त्यामुळे राज्यातील पोल्ट्री व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडलाय. अंड्याच्या भावानं कोंबड्या विकायची वेळ आली आहे.कोल्हापूरमध्ये सेल लावून कोंबड्यांची विक्री केली जात आहे. अवघ्या १०० रुपयांमध्ये ५ कोंबड्या मिळत आहेत. कोरोना व्हायरसच्या भीतीनं ग्राहकांनी चिकन खाणं सोडून दिलंय. त्यामुळे धुळवडीच्या मुहूर्तावर अक्षरशः सेल लावून कोंबड्या विकण्यात आल्या. सकाळी २०० रुपयांना पाच या दरानं कोंबड्यांचा सेल लागला होता. दुपारनंतर तर १०० रुपयांत पाच कोंबड्या विकण्यात आल्या.

Post a comment

 
Top