web-ads-yml-728x90

Breaking News

औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नामकरणाला मंजुरी

BY – युवा महाराष्ट्र लाइव – औरंगाबाद |
विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली आहे. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील “धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ” असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे. तसेच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल. यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे. तर कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ कोल्हापूर असे करण्यात आले आहे. त्यामुळे आता याच धर्तीवर औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

No comments