web-ads-yml-728x90

Breaking News

केंद्र व राज्य शासनानी कर्तव्यदक्ष पोलिस,सैनिकांना दुप्पटीने पगार द्दयावा - सौ.ज्योती नामदेव शेलार यांची मागणी

BY – मयुर जाधव,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
संपुर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आले असुन कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पंतप्रधान,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी केले आहे.तसेा अत्यावश्यक सेवांचा लाभ घेण्यासाठी गर्दी करू नये आणि एकाच व्यक्तीने अत्यावश्यक वस्तु घेण्यास घराबाहेर पडावे अशा सुचनाही दिल्या गेल्या आहेत.संपुर्ण भारत लॉकडाऊन असतांना संचारबंदी साठी पोलिस तैन्यात करण्यात आले आहे.प्रत्येकाला कुटूंब आहे तसे पोलिसांनाही कुटूंब आहे परंतु स्वतःची काळजी न करता घटकांतील प्रत्येक नागरिकांच्या संरक्षणासाठी अहोरात्र आपली जबाबदार कर्तव्यदक्ष म्हणून निभावत आहेत.रस्त्यावर हा एकच वाघ दिसत आहे जो नागरिकांसाठी व त्यांच्या कुटूंबासाठी उन्हात तापतो.नागरिकांना मारायची पोलिसांना हाऊस नाही परंतू नागरिकांना सुचना करण्यात येऊनही नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचे दिसत आहेत त्यामुळे काठीचा आवाज त्यांना काढावा लागतो.सद्दरची परिस्थिती नागरिकांनी जाणून घेतली पाहिजे की कोरानो विषाणू किती घातक ठरत आहे.तो एका व्यक्तीच्या सहाय्याने दुसर्‍या व्यक्तीस संसर्गाने होऊ शकतो याची परिकल्पना असतानाही आपला नागरिक रस्त्यावर फिरतांना दिसत आहे. अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत सगळीकडे आपला महाराष्ट्र पोलिस आपल्या कार्याची भुमिका साकारत सद्रक्षणाय खलनिग्रहणाय याची व्याख्या सांगत आहे. अशा प्रत्येक पोलिस,आर.मी सैनिक यांना केंद्र व राज्य शासनाने एका महिण्यात दोन महिण्यांचा पगार द्दयावा अशी मागणी मुरबाड विकासमंचाच्या अध्यक्षा यांनी देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचेकडे या प्रसिध्दी माध्यमाच्या सहाय्याने केली आहे.काही ठिकाणी पोलिसांवर हात उचलले गेले तर काही पोलिसांना गाडीने उडवले गेले तरी महाराष्ट्र पोलिस व सैनिक आपले काम चोखपने बजावत असतांना दिसत आहे.लॉकडाऊन असतांना सर्वांना पगार मिळेल,रेशन धान्य कमी स्वस्तःत मिळेल,कर्मचार्‍यांना कामावर काढले जाणार नाही,कंपनी कामगार पासून भांडी घासणार्‍या कामगारापर्यंत पगार दिला जाणार परंतू जे पोलिस,आर.मी.सैनिक अहोरात्र नागरिकांच्या सेवेसी कोरोनाशी लढा देत नागरिकांच्या कुटूंबाला सुरक्षित ठेवत आहे अशा कर्तव्यपरायण भुमिकेतील खरा हिरो यांना पगार का वाढवून दिला जात नाही अशी खंत सौ.ज्योती नामदेव शेलार यांना पडली म्हणून त्यांनी सदरची बाब अतिशय लक्षपुर्वक घेऊन अशा पोलिस,सैनिकांना दोन महिण्यांचे पगार एका महिण्यात मिळण्यास काय हरकत आहे अशा भावना त्यांनी आमच्याशी बोलतांना दिल्या आहेत.त्यामुळे पोलिसांना पगार जोपर्यंत लॉकडाऊन आहे तो पर्यंत पगारात दुप्पटीने वाढ करावी अशी विनंती सौ.ज्योती शेलार यांनी केंद्र व राज्य शासनाकडे या वृत्तवाहिनींच्या माध्यमातून केली आहे.

No comments