0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध चरित्र अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. पुण्यात आज (मंगळवारी) पहाटे त्यांचे निधन झाले. दुपारी बारा वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावी जयराम कुलकर्णी यांचा जन्म झाला होता. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या अनेकविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता (Jairam Kulkarni Passed Away). जवळपास 100 मराठी आणि हिंदी चित्रपटांमधे त्यांनी चरित्र भूमिका साकारल्या. ‘झपाटलेला, माहेरची साडी, नवरी मिळे नवरयाला, आमच्या सारखे आम्हीच’ अश्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या.

Post a comment

 
Top