0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – चंदिगड |
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत धर्मेंद्र यांनी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ला एक रेस्टॉरंट सुरु केलं होतं. या रेस्टॉरंटचं नाव ‘ही मॅन’ (He Man) असं होतं. मात्र, या रेस्टॉरंटला सुरु होऊन अवघा महिनाही पूर्ण होत नाही तेवढ्यात ते बंद पडलं आहे. कारण चंदिगड महापालिकेने या रेस्टॉरंटला टाळे ठोकले आहेत धर्मेंद्र यांचं हे रेस्टॉरंट अनधिकृतपणे बांधण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी रेस्टॉरंटमध्ये गेले आणि त्यांनी कारवाई केली. तिथे गेल्यावर त्यांनी सर्व ग्राहकांना आणि स्टाफला बाहेर काढलं आणि रेस्टॉरंटला टाळं ठोकलं. याबाबत महापालिकेचे उपायुक्त निशांत कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही अनधिकृतपणे निर्माण करण्यात आलेल्या अनेक इमारतींना नोटीस दिली होती. मात्र, आम्हाला त्यावर काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही. त्यामुळे पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली”, असं उपायुक्त म्हणाले. दरम्यान, धर्मेंद्र यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Post a comment

 
Top