web-ads-yml-728x90

Breaking News

मन्नुभार्इच्या दारूवर उत्पादन शुल्काची टक्केवारी ; भारत वॉर्इन शॉप बंद करण्याची नागरिकांची मागणी

BY – गौरव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाडचा भारत वॉर्इन शॉप मुरबाड शहरात असताना मुरबाड नगरपंचायतीच्या इमारतीत दाखल झाला त्या  इमारतीत मन्नु नामक आपला दोन नंबरी धंदा करत असून यामध्ये बनावटी दारूचा धंदा सुरू असताना उत्पादन शुल्काच्या अधिकार्‍यांचा वरदहस्त असल्याची चर्चा सध्या मुरबाडमध्ये सुरू आहे.मागील काही महिण्यात याच भारत वॉर्इन शॉपच्या बनावटी दारूवर उत्पादन शुल्कांनी धाडी पाडल्या परंतू एका नामांकित ढाब्यावर जेवण खावण केले आणि साटेलोटे करून मन्नुभार्इला आशिर्वाद दिला.त्यातच मन्नुभार्इला उत्पादन शुल्काचा पाठिंबा हा कायम राहिला आहे.लाखोचा हप्ता पुरविणार्‍या मन्नुभार्इचा मुरबाडमध्ये बनावटी दारूचा हा एकच धंदा नसून उल्हासनगरमध्येही मोठया प्रमाणात बनावटी धंदयाचा सुर उमटला आहे.त्यातच मन्नुभार्इला एका राजकारणी समर्थकांचा पार्टनर असल्याची चर्चा असल्याचे बोलले जात असताना राजकारणी समर्थकही या दारूच्या बनावटीत  सामील असल्याचे सुत्रांकडून कळत आहे.पळाला नाही ससा,अन नगरपंचायतीच्या इमारतीत मन्नुभार्इ घुसला कसा अशा शब्दाचा मारा नागरिकांनी शासनाला मारला आहे.अशा बनावटीच्या मन्नुभार्इला मुरबाडमधून काढा,त्याच्या बनावटी दारूमुळे अनेक जणांचा मुत्यु झाला आहे हे प्रकरणही आजतागायत शासनाच्या कागदावर आणण्यात आले नाही.बनाव्वटी लेबलचा बादशाहा असणार्‍या मन्नुभार्इचे दारूचे दुकान बंद करण्याची मागणी अनेक संघटनांनी मुख्यमंत्री यांचेकडे करण्यात आली आहे.एकीकडे शासन दारू बंद करते तर दुसरीकडे अधिकारी वर्ग लाखोचा हप्ता घेऊन बनावटी दारूच्या मन्नुभार्इला छत्रसावली देते हे शासनाला दिसलेच नाही.तक्रारी करण्यात आल्या परंतू तक्रादाराची दखल घेतली गेली नाही,तक्रारी दाबण्यात आल्या,अधिकारी वर्ग मॅनेज झाले अन कालचा मन्नुभार्इ राजकारणी समर्थकाच्या पार्टनरकीमुळे आपले वर्चस्व गाजवू लागला.त्यातच मुरबाड शहरातील नगरपंचायत इमारतीत भारत वॉर्इन शॉप थाटल्यामुळे येथिल परिसरात नाहक त्रासाचा विषय आहेच कारण जवळच मोठे महाविद्दयालय असल्याने भारत वॉर्इन शॉप दुकानात बेवडे सेवडे दारू पिण्यासाठी येतात आणि तेथील परिसरात दारू पिऊन दारूच्या बाटल्या जागीच टाकून थैमान घालतात. भारत वार्इनशॉप समोर भांडणे हाणामारी हे सतत होत आहे.काही ठिकाणी दारूमुळे अपघात झले याचीही नोंद होत नाही त्यातच मन्नुभार्इ बनावटी विक्री दारूमुळे दारू घेणार्‍याला जी.एस.टी बिले देत नाही.याचा फायदा भारत वॉर्इन शॉपचा राजा मन्नुभार्इ याने घेतल्याने अलीकडे मोठया प्रमाणात शासनाच्या कोटी रूपयाच्या जी.एस.टी कराला बुडविले असल्याचे समजत आहे.मन्नुभार्इच्या दुकानात दारू कोणत्या कंपनीची आणि किती कर शासनाला भरला,याची चौकशी उत्पादन शुल्क विभाग गंभीररित्या करित नाही.अशा मन्नुभार्इचे बनावटी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनेसह नागरिकांनी केली असून मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी ठाणे यांनी लक्ष वेधून कारवार्इ करण्यात यावी असा जोर उमटत आहे.

No comments