0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची मागणी तमाम देशवासियांकडे केली आहे. देशवासियांना संबोधित करतांना मोदींनी म्हंटल आहे की जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी आपण स्वतःने स्वतःवर घातलेली बंधने याचे पालन प्रत्येक नागरिकाने केले पाहिजे. तसेच  देशातील नागरिकांना 22 मार्चला सकाळी 7 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत  घराबाहेर न पडण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.  नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या किराणा सामानाचा  साठा करू नये. जेणेकरून जीवनाश्यक वस्तूचा तुटवडा पडेल असं आवाहन देखील मोदींनी केलं आहे. तसेच या कर्फ्यूमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. हा आदेश राज्य सरकारनेही पाळावा असं मोदींनी म्हंटले आहे. जनतेला संबोधित करतांना नरेंद्र मोदी सुरूवातीलाच असे म्हणाले की मी 130 कोटी भारतीयांकडे काहीतरी मागायला आलो आहे. कोरोना व्हायरसवर अद्यापही कोणतेही लस, औषध शोधण्यास यश आले नाही. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढणे स्वाभाविकच आहे. तसेच ज्या देशामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांवर मोठं संकट ओढवलं आहे. भारत सरकार या परिस्थितीवर नजर ठेवून आहे.

Post a comment

 
Top