0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – बदलापूर |
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी चाळीशी नंतरचे आयुष्य या विषयावर नुकताच अशोक आयुर्वेद क्लिनिक,मोहनानंद नगर, बदलापूर, पश्चिम येथे डॉ.रुपाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचे चाळीशी नंतरचे आयुष्य हे खरे तर विचारांनमध्ये प्रगल्भता आणणारे वय,पण वयाच्या वेगळ्या वळणावर शरीर  व मन या स्तरावर अनेकसे बदल होत असतात.हे बदल वेगवेगळ्या रुपात खुणवत असतात, पाळीच्या तक्रारी,वाढणारे वजन,मानसिक तणाव,चिडचिड,नविन आजाराची सुरूवात या सगळ्यांना यशस्वी पणे सामोरे जाण्याचे व आनंदी जीवन जगण्याचे तंत्र समजून घेऊन आयुष्य भरभरून जगता यावे, आयुर्वेदीक जीवनशैली अंगीकारुन शारीरिक व मानसिक स्तरावर निरोगी रहाण्यासाठी,मार्गदर्शन करण्यासाठी त्याच बरोबर,मागील अठरा वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये सातत्याने ज्या रुग्णांनी विश्वास व प्रेम दाखविले  अशा रुग्णांनप्रती कृतज्ञता दर्शविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रकृती परिक्षण या विषयावर डॉ.रुपाली शिंदे यांनी उपयुक्त माहिती दीली. चाळीशी नंतर आहार विहार कसा राखावा या विषयावर प्रमुख पाहुण्या डॉ.स्नेहल जगदाळे यांनी सुंदर मोलाचे मार्गदर्शन केले.याप्रसंगीचा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ.रुपाली शिंदे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

Post a comment

 
Top