web-ads-yml-728x90

Breaking News

डोंबिवली नागरिकांसह व्यापारी वर्गांनी दिला चांगला प्रतिसाद

BY - जतिन दोशी,युवा महाराष्ट्र लाइव – डोंबिवली |
आज डोंबिवलीमध्ये बंद पाळण्यात आला.यावेळी मोठया प्रमाणात पोलिसांनी,कमांडो चोख बंदोबस्त ठेवला होता.रेल्वे स्थानकावर नागरिक कोणत्या कारणांसाठी बाहेर पडलात म्हणून आदराने चौकशी करण्यात आली.
यावेळी नागरिकांनी सदरहू कारण स्पष्टपणे सांगितल्याने नागरिकांनीही चांगल्या प्रकारे पोलिसांना व महाराष्ट्र तसेच केंद्र,सरकारला प्रतिसाद दिला आहे.
त्याचबरोबर रस्त्यावर नेहमी प्रमाणे गर्दी नव्हती त्यामुळे डोंबिवलीमधील काही परिसरात रस्ता मात्र शुकशुकाट पाहायला मिळाला.नागरिकांनी कोरोनाला हद्दपार करण्याकरिता एकतेची ताकद आज दाखविली आहे.

No comments