web-ads-yml-728x90

Breaking News

कॉर्पोरेट जगताने सामाजिक बांधिलकी जपत शासनास सहकार्य करावे - उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कॉर्पोरेट जगताने सामाजिक बांधिलकी जपत शासनास सहकार्य करण्याचे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. ‘इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स’ या संस्थेच्या वतीने आयोजित ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ या विषयावरील चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून श्री.देसाई बोलत होते. यावेळी लेफ्टनंट जनरल जे.एस. अहलुवालिया उपस्थित होते.काही उद्यमींनी शासनासोबत काम करण्याची तयारीदेखील दर्शविलेली आहे. इतरांनीही तशी तयारी दाखवून गरीब जनतेला सहकार्य करण्यास हातभार लावावा, असे श्री. देसाई म्हणाले.

No comments