0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे  |
शहरातील पुलगेट परिसरातील एक खाद्यपदार्थाचे गोडावून आज (शुक्रवारी) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत जाळून भस्मसात झाले आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत या गोडाऊनमधील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. शॉर्टसर्किटने ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येतो. या आगीत अंदाजे १५ लाखाच्या खाद्यपदार्थ जळाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत या गोडाऊनमधील सर्व साहित्य आगीत जाळून भस्मसात झाले होते. सुदैवाने ही आग इतरत्र पसरली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच खबरदारी घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

Post a comment

 
Top