0
BY – गौरव एन.शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मंत्रालय,मुंबई |
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज न्या. भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ दिली.शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते.प्रारंभी राष्ट्रगीतानंतर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी न्या. भूषण धर्माधिकारी यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली. शपथ ग्रहणानंतर राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आणि मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन न्या. धर्माधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a comment

 
Top