0
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
कोरोना रोगाशी दोन हात करण्यासाठी संपुर्ण भारतीयांनी कंबर कसली आहे.डॉक्टर, नर्स, कर्मचारी,पोलिस,जिल्हाधिकारी सर्व यंत्रणा,पत्रकार,राजकीय नेते,मंत्री,समाजसेवक तमाम जनतेने घेतलेला पुढाकार त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी 22 मार्च रविवारी 7 ते रात्रौ 9 दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी 
मोदी,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी पुकारलेल्या जनता कर्फ्युला सहकार्य करून संध्याकाळी  कर्तव्यावर असणार्‍या यंत्रणेचा स्वागत देशातील तसेच महाराष्ट्रातील  जनतेने लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत टाळया ताट वाजवून स्वागत केले.
या स्वागत कक्षात मुरबाड,भिवंडी,शहापूर,बदलापूर,उल्हासनगर,वाडा,शहापूर,ठाणे,कल्याण,अहमदनगर, अंबरनाथ सह राज्यातील खेडयापाडयापासून प्रत्येक शहरात टाळयांचा गजर स्वागत गल्लीबोळात साजरा झाला.

Post a comment

 
Top