0
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – पनवेल |
वकीली क्षेत्रातून ज्यांनी आपले करियर घडविले अशा विद्दयार्थ्यांना पनवेलच्या सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ च्या वतीने कुलगुरू पदवी वाटप करण्यात आले.यंदाच्या 2020 च्या सालात कोन्वोगेशन हा 6 व्या वर्षाचा आनंदमय ठरला.या पदवी वाटप सोहळयाला शेकडो विद्दयार्थ्यांची उपस्थिती प्रार्थनिय ठरली.ज्यांची वर्णी लागली त्यांस पदवी मिळाली त्यांना पदवी वाटप करतांना पनवेलच्या सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ महाविद्दयालयात शिक्षण  घेऊन आम्ही पुढे आलो असा एकच नारा घुमला.या कार्यक्रम सोहळयाचे आयोजन पनवेलच्या सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ च्या माध्यमातून करण्यात आले.
यावेळी पदवी समारंभ सोहळयाला प्रमुख पाहुणे म्हणून आगरी कोळी समाजनेते जयेंद्र दादा खुणे, पनवेलच्या सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ चे प्राचार्य डॉ.मृत्युंजय पांडे,छत्रपती शिवाजी महाराज मुंबर्इ विद्दयापीठाचे कुलगुरू ए.के.सिन्हा,श्री.शर्मा यांनी दिपप्रज्वलन करून विद्दयार्थ्यांना पुढिल वाटचालीस मोलाचे मार्गदर्शन केले व विद्दयार्थ्यांना कुलगुरू पदवीचे वाटप करण्यात आले.या पदवी वाटप समारंभाला जयेंद्र दादा खुणे यांनी वेळात वेळ काढून कायदा व सुव्यवस्थेचे मार्गदर्शन केल्याने विद्दयार्थ्यांमध्ये पुढिल वाटचालीला उत्साह मिळाला.या पदवीचे वाटप त्यांचे आदरनीय गुरूवर्य शिक्षक प्रोफेसर सुभाष सोनकर,प्रोफेसर ललित पगारे या समारंभाचे निवेदक म्हणून सोनिका ढाका मॅडम,श्रध्दा म्हात्रे यांनी आपली भुमिका चांगल्या पध्दतीने बजावली तर आभार प्रोफेसर अभिनव दुबे यांनी मानले.

Post a comment

 
Top