0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे कोरोना व्हायरची खबरदारी म्हणून दिल्ली सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. 23 मार्चला म्हणजेच उद्या सकाळी 6 वाजेपासून दिल्लीत लॉकडाउन करण्यात येणार आहे. हे लॉकडाऊन 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत राहणार आहे.
31 मार्चपर्यंत दिल्लीत लॉकडाउन घोषित
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे दिल्ली सरकारने दिल्लीमध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. 23 मार्चला म्हणजेच उद्या सकाळी 6 वाजल्यापासून दिल्लीतील लॉकडाऊन सुरू होईल, जे 31 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत राहणार आहे. या काळात बर्‍याच सेवा बंद राहतील, परंतु आवश्यक त्या सुविधा नागरिकांसाठी सुरूच ठेवण्यात येणार आहेत. कोरोना व्हायरचा संसर्ग तिसर्‍या टप्प्यावर पोहोचू नये म्हणून आम्ही उद्याच लॉकडाऊन करणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

Post a comment

 
Top