0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोना व्हायरसला जागतिक महामारी घोषित केले आहे. याच कारणांमुळे आता भारत सरकारने 15 एप्रिलपर्यंत विदेशातून येणाऱ्यांचे व्हिजा रद्द केले आहे. 13 मार्चपासून हे प्रतिबंध लागू होणार आहे. यामध्ये केवळ राजकारणी, अधिकारी, संयुक्त राष्ट्र संघ आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या कर्मचाऱ्यांना सूट मिळणार आहे.देशातील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याने केंद्र सरकारने ही खबरदारीची पावलं उचलली आहे. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांमधून 15 फेब्रुवारीनंतर येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस स्वतंत्र कशात ठेवण्यात येणार आहे. यासोबतच 15 एप्रिलपर्यंत पर्यटन व्हिसाही सरकारने बंद केला आहे.कोणीही अनावश्यक विदेश यात्रा करु नये असा सल्ला भारत सरकारने नागरिकांना दिला आहे. जर ते प्रवास करुन भारतात परत आले तर त्यांना कमी कमी 14 दिवस लोकांपासून दूर ठेवण्यात येऊ शकते असेही भारत सरकारने सांगितले आहे.

Post a comment

 
Top