0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
पनवेल येथून परभणी कडे निघालेल्या चाळीस लोकांची सोय मुरबाड येथील कुणबी समाज हॉल मध्ये केली आहेया लोकांमध्ये पंधरा लहान मुले दोन गर्भवती महिला आहेत त्यांचे मदतीला मुरबाड मधील मंडळी सरसावली आहेत  संभाजी नगर मुरबाड येथील कुणबी बांधव अशोक भोईर यांना ही माहिती समजताच त्यांनी या लोकांसाठी बिस्किटे , पाणी , अल्पोपहार , लहान मुलांसाठी खेळणी वाटप केली 
तसेच त्यांच्या दुपारच्या जेवणाची सोय करण्याची इच्छा व्यक्त केली मुरबाड नगर पंचायतीचे कर्मचाऱ्यांनी चहा , बिस्किटे दिली नगराध्यक्ष छायाताई चौधरी यांनी अधिकाऱ्यांना सूचना देऊन या लोकांची वैद्यकीय तपासणी करून घेतली तसेच लोकांची आस्थेने चौकशी केली मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी कंकाळ,गटविकास अधिकारी केळकर यांनी आरोग्य यंत्रणा कामाला लावली तहसिलदार अमोल कदम यांनी भेट देऊन या लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले माजी नगराध्यक्ष किसन कथोरे यांनी त्यांना जेवणाची पाकिटे आणून दिली

Post a comment

 
Top