0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद असल्याने सिंगापूर विमानतळावर अडकलेल्या महाराष्ट्रातील ५० विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी तातडीने मदत करणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.श्री.सामंत म्हणाले, या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्र शासनाशी संपर्क  सुरु असून यासंदर्भात खासदार शरद पवार आणि खासदार विनायक राऊत यांच्यामार्फतही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लवकरच या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले जाईल.श्री.सामंत यांनी तन्वी बोडस या विद्यार्थिनीशी दूरध्वनीवर संपर्क साधत सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्यशासन केंद्र शासनाच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचा विश्वास दिला.

Post a comment

 
Top