web-ads-yml-728x90

Breaking News

एकही गिरणी कामगार बेघर राहणार नसल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

BY – गौरव एन.शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मंत्रालय,मुंबई |
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारांचे मोठे योगदान आहे. या प्रत्येक गिरणी कामगारास घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असून एकही गिरणी कामगार बेघर राहणार नाही,  अशी ग्वाही  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांना दिली. गिरणी कामगारांनी त्यांना मिळालेली घरे इतरांना विकू नयेत आणि मुंबई बाहेर जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. म्हाडाच्या विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार व त्याच्या वारसांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती भागातील बॉम्बे डाईंग, स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागेवर उभारण्यात आलेल्या 3 हजार 894 सदनिकांची सोडत आज वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, महापौर किशोरी पेडणेकर, सभापती विनोद घोसाळकर, झोपडपट्टी पुनर्वसनचे सभापती विजय नाहटा, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडिलकर उपस्थित होते.

No comments