BY – युवा महाराष्ट्र
लाइव – मुंबई |
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत
आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिपत्याखालील टोल नाक्यांवरून माल
वाहतूक (good transport) करणाऱ्या वाहनांवर आकारण्यात येणारी टोल वसुली आज रात्री १२
वाजल्यापासून बंद करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार
सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतची अधिसूचना आज जारी केली आहे.त्यानुसार, या टोल
वसुलीस दिनांक २९ मार्च २०२० च्या मध्यरात्रीपासून स्थगिती देण्यात आली आहे. टोलवसुलीच्या
स्थगितीचे हे आदेश पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत अंमलात राहतील, असे सार्वजनिक बांधकाम
विभागाने कळविले आहे.
Post a comment