0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक ठेव्यांमध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांना वेगळेच महत्त्व आहे (Painter Haresh Paithankar visit 110 Forts). हे अभेद्य आणि अजेय किल्ले आजही मराठेशाहीच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत. हाच ऐतिहासिक ठेवा चित्रकार हरेष पैठणकर यांनी ‘रंग सह्याद्री’ या संकल्पनेतून चित्रस्वरुपात सर्वांच्या भेटीला आणला आहे. मुंबई येथील जंहागीर आर्ट गॅलरी येथे 9 ते 15 मार्च दरम्यान हा ठेवा प्रदर्शन स्वरुपात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात साडेतीनशेहून अधिक गड-किल्ले आहेत. यातील 100 हून अधिक गड-किल्ल्यांचा वैभवशाली इतिहास त्यांनी आपल्या चित्रातून मांडला आहे. चित्रकार हरेष पैठणकर हे मागील 10 वर्षांपासून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यावर भटकंती करत आहेत. त्यांची ही भटकंती 2007 ते 2008 सालापासून सुरु आहे. राज्यातील 13 जिल्ह्यातील जवळपास 100 गड-किल्ल्यांची चित्रं या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. हरेष यांनी आतापर्यंत 115 ते 116 गड-किल्ल्यांची पायी भटकंती केली आहे.

Post a comment

 
Top