BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
वानरलिंगी सुळका नाणेघाट (जुन्नर) किल्ले जीवधनला लागुनच दक्षिणेला
आहे. 350 फुट उंच असलेला सुळका पर्यटकांना नेहमीच साद घालत असतो. येथे 15 ते 20 पर्यटक
आरामात बसु शकतात.
गडाच्या टोकाला
"वानरलिंगी" असलेला हा सुळका लक्षवेधी आहे. गडावरचे मुख्य आकर्षण म्हणजे
किल्ल्यापासुन सुटावलेला वानरलिंगी सुळका होय. याला जीवधन किल्ल्यांचा किल्लेदार म्हणून
संबधले जाते. जीवधन किल्ले ते वानरलिंगी सुळका या दरी मध्ये दोरी बांधून दोरीच्या साह्याने
एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहचायचे म्हणजे व्हॅलीक्रॉसींग करायचे असा प्रयोग
करण्याचे सह्यगीरी अॅडवेंचर मुरबाड टिमचे संंचालक दिपक विशे व कुसुम विशे यांनी ठरवले.
व ३५० फुट वानरलिंगी सुळका सर करून सेटअप लावला. सोबत सपोर्ट टिम होती. सर्व सुरक्षा
तंत्र व साहित्याचा वापर करून. जीवधन ते वानरलिंगी या व्हॅलीक्रॉसींगचा थरार अनुभवला.
वानरलिंगी सुळक्यावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवून मोहिमेची सांगता झाली.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
''जीवधन
- वानरलिंगी व्हॅलीक्रॉसींग करणारी सह्यगीरी अॅडवेंचर मुरबाड ही आमची ठाणे जिल्ह्यातील
ग्रामीण भागातील पहिलीच संस्था असेल असा विश्वास आहे ''
विनोद आघाणे
संचालक,
सह्यगीरी
अॅडवेंचर मुरबाड
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Post a comment