web-ads-yml-728x90

Breaking News

राष्ट्रीय एकता व कर्तव्य पार पाडण्यासाठी पुरूष हक्क संरक्षण समिती व मेन्स राईट्स फाउंडेशन वेलफेअर सोसा तर्फे कुटुंबसंस्था आणि विवाहव्यवस्था वाचविण्याचा प्रयास !

BY – युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
भारतातील पहीली नोंदणीकृत पुरुष हक्क समिती जी राष्ट्रीय एकता व अखंडता वाचविण्यासाठी तसेच महत्वाचे म्हणजे सध्या कोरोना व्ह्यायरचे वाढते संक्रमण /प्रादुर्भाव पाहता संघटित-असंघटित मजदूर तसेच  पिछड़ा शोषित व अन्य समुदाय इत्यादी सर्वानी  या आपात्काल स्थिती मध्ये सुरक्षाचे काय उपाययोजना करून सावधानी बाळगायची व या व्हायरसचे  वाढते संक्रमण/प्रादुर्भाव त्वरित रोखण्यासाठी तसेच त्याबाबत लोकांमधे जागरूकता आणून  कुटुंबसंस्था व विवाहव्यवस्था वाचवून राष्ट्रीय एकता अखंड राहण्यासाठी भारत सरकार ला  सहकार्य करण्याचे कार्य करणे आवश्यक आहे. म्हणून समिती  सम्पूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये कार्य करीत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून पु    सं समिती व मेन्स राईट्स वेलफेअर  फाउंडेशन सोसायटी चे पुणे अध्यक्ष /राष्ट्रीय सहसचिव अँड.संतोष शिंदे, तसेच त्यांचे कार्यकारिणीतील सौ.संगीता ननावरे, श्री.प्रसाद पंचपोर, तारिक अली, भोपाळ, ललित ठाकूर, तेजस नाईक, यांनी मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार तर्फे कलम -144 नुसार लावलेल्या संचारबंदी व भारतात आपल्या मा .पंतप्रधान यांनी केलेल्या लॉकडाऊन चा आदर राखणे व त्याकरिता लोकांमधे जागरूकता वाढवणे साठी फोन वर चर्चा करून या आपदाग्रस्त, अन्यायग्रस्त लोकांना आवशकता भासल्यास निशुल्क सल्ला, सहाय्य,  मदद मिळवून देण्याबाबत पाऊल उचलले आहे . कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाबाबत लोकांनी उपलब्ध माध्यमाच्या द्वारे अफवा पसरू न देणे, सरकारच्या आदेशांचे पालन करून सरकारला सहकार्य करावे,   सर्वानी आपली व  स्व:ताची तसेच आपल्या परिवार व परिवारातील लोकांची काळजी घेवून या महामारीपासून संरक्षण करने, सर्वानी घरातच रहा,  कुणीही  घराबाहेर पडू नका, विनाकारण तर अजिबात नको पण कारण असताना देखील ते टाळून रस्त्यांवर येवूच नका, जास्त गर्दी-घोळका करू नका,  इत्यादी  सरकारी नियमांचे काटेकोर पालन स्वयंस्फूर्तीने करा  तरच आपण कोरोनाच्या संक्रमणा वर नक्कीच अल्पावधीत विजय मिळवू.  गेल्या बऱ्याच वर्षामध्ये जास्त संखेने पत्नी-पत्नी मधील वाद-विवाह /केसेस भारतातील न्यायालयामधे दाखल आहेत.या कोरोना विषाणू च्या वाढत्या संक्रमणमुळे  सम्पूर्ण भारतातील  हिंदू-मुस्लिम-शीख-ईसाई आदी सर्व जाती- धर्माचे सर्वानी आपले हेवे-दावे विसरून, जाती धर्म भेद विसरून या महामारीला  हद्दपार करण्यासाठी कंबर कसलेली आहे. तर मग भांडणारे पती-पत्नी सुध्दा आपले भूतकाळातील वाद विसरून एकत्रित एका छताखाली येवून याला तोंड देवू शकतात. त्यामुळे कोर्टातील पेंडिंग वीवादीत केसेस मधील पती-पत्नी यांनी आपसी द्वेष-क्लेश विसरून मुलांचे  भविष्य आणि आपला तूटनारा संसार व परिवार वाचवू शकतात. यामुळे भारताची ताकद वाढेल,  कोर्टावरील वाढता ताण व केसेस ची संख्या देखील कमी होईल.यासाठी कोणाही पती-पत्नी ला त्यांचा संसार व पारिवार वाचवणेकरिता कानुनन सल्ला, सहाय्य आवश्यक असल्यास आम्ही त्यांच्या वीवादीत केसमध्ये निशुल्क सल्लारुपी मदद करण्यास तैयार आहे. जगात वाखाणण्याजोगी भारतिय  कुटुंबसंस्था आणि विवाहव्यवस्था वाचवणे अत्यंत आवश्यक असल्याने निशुल्क सल्ला व मार्गदर्शना करिता सम्पर्क करण्याचे आवाहन अँड.संतोष शिंदे-7507004606, सौ.संगीता ननावरे-9923832409, प्रसाद पंचपोर, प्रसाद ननावरे, तारिक अली, तेजस नाईक , ललित ठाकूर, आदी याअन्वये करीत आहेत.


No comments