0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
आयपीएलच्या भवितव्याचा फैसला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आयपीएल किंवा इतर मोठे कार्यक्रम घ्यायचे का नाही, याबाबत निर्णय बैठकीत होईल, असं वक्तव्य टोपे यांनी केलं आहे.कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार आहे. बुधवारपासून व्यापक पद्धतीने जनजागृती करण्यात येणार आहे. पोस्टर, वर्तमानपत्र, वृत्तवाहिनी, चित्रपटगृह यांच्यामध्ये जनजागृती केली जाईल, असं राजेश टोपे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संदर्भात तातडीची बैठकही बोलावली आहे. मंत्रालयात दुपारी १ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह मुंबईतील काही तज्ज्ञ डॉक्टरही उपस्थित राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना आणि जनजागृती यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.

Post a comment

 
Top