web-ads-yml-728x90

Breaking News

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज; आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून देणार – सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील

BY – युवा महाराष्ट्र लाइव – सांगली |
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असून प्रशासनाचे परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण आहे. या संकटाचा मुकाबला करत असताना आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देणार असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, औषधे, वैद्यकीय उपकरणे, अनुषंगिक साहित्य यांची तात्काळ खरेदी करा. कोणतीही तडजोड करू नका, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सद्यस्थितीत 1266 प्रवासी परदेशवारी करून आले आहेत. आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलेल्या 80 प्रवाशांपैकी 54 जणांची कोरोना विषाणू चाचणी निगेटिव्ह आली असून असून 25 जणांना कोरानाची लागण झाली आहे. या सर्वांवर मिरज सिव्हील हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहेत व सर्वांची प्रकृती स्थीर आहे. एक जणाचा चाचणी अहवाल अप्राप्त आहे. ज्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 40 व्यक्ती इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये आहेत. यामधील 27 व्यक्ती इस्लामपूर येथे तर 13 व्यक्ती मिरज सिव्हील हॉस्पीटल येथे आहेत. 212 व्यक्तींचा 14 दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे तर 934 परदेशवारी करून आलेली प्रवासी अद्यापही होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत.


No comments