0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
जगभरात हौदोस घालणारा कोरोना व्हायरस आता भारतात येऊन ठेपला आहे. आतापर्यंत भारतात 81 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील व्यायामशाळा, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस झपाट्याने पसरवू नये यासाठी नागरिकांनी दुरचा प्रवास टाळावा तसेच गर्दीत जाणे टाळावे एकत्रित ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरीमधील शाळांना पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचं त्यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आज मध्यरात्रीपासून सर्व निर्णय लागू केले जाणार आहेत. तसेच शालेय परीक्षा उशिरा घेण्यासंबंधी विचार केला जात आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.

Post a comment

 
Top